पुण्यातील पेठांची यादी व माहिती (इतिहास)
पेठेचे नांव पेठ कोणी वसविली कोणत्या वर्षी वसविली नांवामागचे कारण :
कसबा पेठ राष्ट्रकूट राजे ५ व्या शतकात
गुरुवार पेठ शहाजी राजे १६२५
सोमवार पेठ दादोजी कोंडदेव १६३६
मंगळवार पेठ दादोजी कोंडदेव १६३७
शुक्रवार पेठ निळोपंत मुजूमदार १६७०
रविवार पेठ निळोपंत मुजूमदार १६७०
शनिवार पेठ मोरोपंत पिंगळे १६७५
भवानी पेठ संभाजीमहाराज १६८२
भवानी मातेच्या मंदिरावरून नांव पडले
घोरपडे पेठ सेनापती संताजी घोरपडे १६९२ त्यांचे स्मरणार्थ
बुधवार पेठ औरंगजेब १७०३
गणेश पेठ सखारामबापू बोकिल १७४८ नंतर गणेशाचे नांव
सदाशिव पेठ सदाशिवराव पेशवे १६५७ त्यांचे स्मरणार्थ
नारायण पेठ नारायनराव पेशवे १७७० त्यांचे स्मरणार्थ
रास्ता पेठ सरदार रास्ते १७८० त्यांचे स्मरणार्थ
नाना पेठ नाना फडणवीस १७८३ त्यांचे स्मरणार्थ
गंज पेठ (हिचेच आत्ताचे नांव महात्मा फुले पेठ असे आहे)
ब्रिटिश सरकारने १८१८ नंतर महात्मा फुलेंच्या स्मरणार्थ
नवी पेठ ब्रिटिश सरकारने १८१८ नंतर नव्याने वसवलेली असल्याने
सोमवार पेठ : इसवी सन १७७३ मध्ये थोरले बाजीराव पेशव्यांनी नगराच्या पूर्व सीमेवरून होणार्याु दळणावळणावर लक्ष ठेवणे सोयीचे जावे या कारणास्तव सुरक्षेसाठी विशेष व्यवस्थाकेळी व अनेक गस्ती नाके बांधलेच पण त्याचबरोबर जुन्या शाहूपुरा पेठेची नव्याने पुर्बांधणी करून तिचे ‘सोमवार पेठ’ असे नवीन नामकरणही केले. येथील नागेश्वर मंदिर हे आबा शेलूकर ह्यांनी बांधले आहे. .
मंगळवार पेठ : औरंगजेब बादशाहाचा मामा शाहिस्तेखान दख्खन मोहीमेवर ९ मे १६६० रोजी पुण्यामधे आला,त्यावेळी त्याने लाल महालामद्ध्ये आपला मुक्काम ठोकला , आणि त्याचेसोबत आलेल्या अडीच लाखांच्यावर सैनिकाची व्यवस्था त्याने लाल महालाच्या आजूबाजूच्या असलेल्या मोकळ्या जागेत केली.जवलूनच मुठा नदी जात असल्याने पाण्याचीही सोय झाली. तीन वर्षातच बाजारपेठ बहरली. शाहीस्तेख्नाचीया पेठ म्हणून हीला शास्तापुरा आसेही म्हणत असत अशीही कागदोपत्री नोंद आढसळते.छत्रपती शिवाजीमहाराजांनी शाहीस्तेखानाच्या छावणीवर हल्ला करून लाल महालाच्या खिडकीतून शाहीस्तेखान पळून जात असता त्याची बोटे छाटली त्यामुळे घाबरून जाऊन खान दिल्लीला पळून गेला.
बुधवार पेठ : रविवार पेठ चार वर्षातच भरली म्हणून नानासाहेब पेशव्यांनी त्याच्या जवळसच नवी वसाहत वसविण्याचा निर्णय घेतला व त्या वसाहतीचे ‘बुधवार पेठ’ असे नामकरणही केले. या ठिकाणी रस्त्याचे दुतर्फा कापडाचे व्यापारी कापड व्यवसाय करीत असल्याने या भागाला ‘कापड गंज (पेठ) किंवा कापड आळीअसेही म्हणत, जवळच एक विठ्ठलाचे मंदिरही होते त्याच्या समोरच नारायण गावचे काही पासोड्या विकणारे व्यापारी बसत म्हणून त्या विठ्ठलालाही ‘ पासोड्या विठोबा ‘ असे म्हटले जाऊ लागले.
गुरुवार पेठ : बुधवार आणि रविवार या दोन्ही पेठांमधील वस्ती व गर्दी वाढली,मोठ्या व्यापार्यां नी तर बरीचशी जागा व्यापून टाकली, पण त्यामुळे छोट्या व्यापार्यांीची फारच गैरसोय होऊ लागली.जवळपासच्या छोट्या छोट्या गावातून आपला माल घेऊन येऊन विकणारे बरेच छोटे व्यापारी होते. दिवसभर व्यापार करून दिवेलागणीला परत घरी जाणारे. अशा व्यापाराला मेण बाजार असे म्हणतात. या छोट्या व्यापार्यां ना व्यवस्थित जागा मिळावी या उद्देशाने नानासाहेब पेशव्यांनी ही नवीन ‘ गुरुवार ’ पेठ वसविली ,तेथे एक वेताळाचे देऊळही बांधले त्यामुळे ‘ वेताळपेठ ’ असाही उल्लेख केलेला आढळतो .या गुरुवार पेठेत अठरापगड जातींचे व्यापारी होते.उदा. सोनार , लोहार , जंगम , काची , पेंधारी , छप्परबंद , मोची , तांबोळी इत्यादी.
शुक्रवार पेठ : जिवाजीपंत अण्णा खासगीवाले कोतवाल यांनी ही पेठ तिसरे पेशवे श्रीमंत बाळाजी बाजीराव यांच्या आदेशा वरुन वसविली होती. क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार हे पेठ इतर सर्व पेठांपेक्षा मोठी होती.
शनिवार पेठ : शनिवार पेठ जरी आधीपासूनच अस्तित्वात असली तरी शनिवार पेठेचे महत्व वाढले ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांच्या काळात च. (इ.स.१७९६ ते १८१७) त्या काळात या शनिवार पेठेला पेठेला अनन्यसाधारण महत्व येण्याचे कारण म्हणजे पेशव्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक,खास मर्जीतले अधिकारी व सरदार आणि इतर दरबारी प्रमुख व्यक्ति यांचे वास्तव्य प्रामुख्याने या पेठेतच होते हे होय.
रविवार पेठ : कसबा पेठ आणि शनिवार पेठ येथील वस्ती वाढत होती आणि जागा अपुरी पडत होती त्यामुळे थोरले बाजीराव पेशवे यांनी पूर्वीच्या केदार वेशीच्या बाहेर जुन्या मलकापुर पेठेच्या दुतर्फा नव्या पेठेची उभारणी करून तिचे (आदित्यवार) ‘ रविवार ‘ पेठ असे नामकरण केले. जुन्या केदावेशिपासून ते पासोद्या विठोबाच्या मंदीरापर्यंतच्या रस्त्यावर व्यापार्यांेनी बाजारपेठा वसविल्या. शेजारच्या मुहियाबाद पेठेतल्या (बुधवार पेठ) कापडालीमध्ये सुद्धा दुकानांची भाऊगर्दी झाली होतीच म्हणूनच रविवार पेठ दक्षिणेकडे वाढवून सराफाञ्ची दुकाने थाटली गेली. रविवार पेठेच्या दक्षिणेकडील टोकाला सोन्या मारुती आहे. रविवार पेठ म्हणजे श्रीमंत व्यापारी पेठ अशी ओळख आहे.
कसबा पेठ : कसबा पेठ ही पुण्यातील सगळयात जुनी पेठ आहे. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती याच ठिकाणी आहे. छत्रपतींचे वडील शहाजी महाराज यांनी कसबा पेथ्त पुण्याच्या दक्षिणेस भव्य लाल महाल बांधला.
गणेश पेठ : रविवारपेठेच्या पूर्वेला आणि गंजपेठे च्या उत्तरेला वसाहत स्थापण्यात आली आणि गणेश पेठ असे नामकरण करण्यात आले. येथे असणाऱ्या डुल्या मारुतीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी, पानिपत संहाराच्या बातम्या ऐकून इथला मारुती डोलू लागला म्हणुन याला ‘डुल्या मारुती’ असे नांव पडले.
मीठगंज पेठ : त्याकाळी या भागात मोठ्या प्रमाणावर मीठाचा व्यापार, साठवण, विक्री चालायची म्ह्णुन या भागाला ‘ मीठगंज ‘ पेठ असे नाव पडले. मिठाबरोबरच येथे मोठ्या प्रमाणावर अॅन मालाची गोदामे होती म्हणून काही काळानंतर ‘ गंज पेठ ‘ असे नामकरण करण्यात आले. त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले येथे रहात असत व आता शासनाने त्याच जागेवर आता त्यांचे स्मारक केल्याने आता या पेठेचे नांव ‘ महात्मा फुले पेठ ‘ असे बदलण्यात आले आहे.
नारायण पेठ : पानिपतच्या युद्धानंतर पांचवे पेशवे नारायण बाळाजी (मृत्यू १७७३) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही पेठ वसविण्यात आली.
घोरपडे पेठ : सरदार मालोजीराव घोरपडे (१७८१) यांचे स्वतःचे खासगी सैन्यदल होते . त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा नांवानेच ही पेठ वसविली गेली.
नाना पेठ : नानासाहेब पेशवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि फक्त धान्य व्यापाऱ्यांसाठी नाना पेठ स्थापन केली गेली, व केवळ व्यापारी उद्देशाकारताच ही पेठ वसविली गेली.
रास्ते पेठ : पेशव्यांचे एक सरदार आनंदराव लक्ष्मण रास्ते (१७८२) हे पेशव्यांचे घोडदळ सांभाळायचे. त्यांच्याच नांवे ही पेठ ओळखली जाते.
भवानी पेठ (टिंबर मार्केट) : नागझरीच्याही पलीकडे जेथे १६०३ मध्ये औरंगजेबाच्या सैन्याची छावणी होती , त्या जागेवर पुण्याचा विस्तार करावयाचे माधवराव पेशव्यांनी ठरवले . तेथील पेशव्यांचे कारभारी सखाराम भगवंत यांनी मोकळ्या जागेत भवानी देवीचे मंदिर बांधले. त्याउले पुढे ही ‘ भवानी पेठ ‘ म्हणूनच ओळखली जाऊ लागली.
घाऊक व्यापारी, तेलबिया,लाकूड आणि किराणा - भुसारी व्यापारी अशी या पेठेची ओळख आजही कायम आहे. मोकळी जागा भरपूर असल्याने बाहेरून आलेल्या मालाची चढ-उतार व साठवण आणि वाटप याच ठिकाणी होते. या पेठेच्या मध्यभागी सूर्यामुखी सिद्धीविनायक मंदिराच्या जवळच चावडी होती. त्यावर रामोशी पहारेकरी असायचे .शेजारी रामोशी गेट पोलिस चौकी आहे.
नागेश पेठ : हिलाच ‘न्याहाल’ पेठ असेही म्हणत असत.
लोकवस्ती वाढली, उदयोगधंदे वाढले नवीन पेठा स्थापन झाल्या. सात वार, सात पेठा हे समीकरण कधीच मागे पडले. आजकाल नवीन शहरेच वसविली जातात.
पण या पेठांमुळे बरेचसे पुणेरीपण टिकविले आहे. काळानुरुप बदल झाले असतील पण ते पुणे आता राहिलेच नाही म्हणणाऱ्यांनी इथे चक्कर मारलीच पाहिजे.
पुण्याच्या या पेठांचे १८६९ ते १८७२ या दरम्यान रे लाईट या ब्रिटीश अधिकाऱ्याकडून नकाशामापन या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार सर्वेक्षण करण्यात आले. कारण तेव्हा पेठा म्हणजेच पुणे आणि पुणे म्हणजेच पेठा होते.