Sunday, April 23, 2017

पैसा, पद और व्यवहार

पॉवर के तीन सोर्स है: पैसा, पद और व्यवहार.

पैसे से जो पॉवर मिलता है वह एकांतजीवी बना देता है. धनोपार्जन के साथ अक्सर घमंड आ जाता है जो समाज से सरोकार सीमित कर देता है.

पद से मिले पॉवर के कारण लोगों को मान सम्मान मिलता है जो सच में डर होता है, इज्जत नहीं. लोग कुर्सी से डरते हैं पर व्यक्ति इसे अपना मान सम्मान और अपनी उपलब्धि मान लेता है. पद छूटता है तो यह डर खत्म हो जाता है. ऐसे शक्स कुंठा में जीने लगते हैं. यही नहीं, जो लोग कभी उनके पॉवर से डरते थे, अपमानित हुए थे वे रिवर्स एक्शन शुरु कर देते हैं.

सही पॉवर व्यवहार से मिलता है. जो अपने व्यवहार से मान- सम्मान कमाते है उनका पॉवर कभी खत्म नहीं होता बल्कि उनके सद्व्यवहार से दिनों दिन चक्रवृद्धि ब्याज की तरह बढ़ता जाता है.

पावरफुल अवश्य बनें पर पैसे या पद से नहीं, व्यवहार से...

Thursday, April 20, 2017

पितृ दोष म्हणजे काय??

पितृदोष |१|

बहूतांशी लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असतोच असतो. याला कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप हे आहे . गरूड पुराणा नुसार , अंत्यकर्मा नंतर करावयाचा विधी हा सर्वांना एकसारखाच असतो. तो म्हणजे दहनापासून दहावे दिनी दशक्रिया विधी , नंतर ११ , व १२ वा एकत्र वा वेगवेगळा , या बाराव्यात सपींडी म्हणून विधी असतो जो हल्ली केलाच जात नाही. यावर उत्तर मिळते आमच्यात करत नाही ! परंतू या वेळी कोणताही भेद न करता सर्व वर्णांना एकाच प्रकारचे विधी शास्त्रात दिले आहेत . या नंतर करतात तेरावा. नंतर उदकशांती करून वर्षभराने प्रथमाब्दिक करतात. या वेळीही अब्दपूरीत व प्रथमाब्दिक अशी दोन श्राद्धे करावयाची असतात जी कोणी हल्ली करत नाहीत....

                                            
तसेच घरात कोणी पुर्वी बाहेर गेला तिर्थ यात्रेस गेला तर तो परत येईलच याची शाश्वती नसायची व तो तिकडे जिवंत आहे वा मृत याचाही पत्ता नसायचा ! अशावेळी बारा वर्षे वाट पाहून तो मृत आहे असे समजून पळसाच्या पानांचा पुतळा बनवून त्याचे दहन करून मग पुढील विधी करावे असे शास्त्र सांगते . परंतु हे कोणी पूर्वी केले होते वा नाही हे समजण्यास मार्गच नसतो कारण , पिढ्या विभक्त झाल्या व वृद्ध लोक जे मार्गदर्शक असतात त्यांना हवा तसा सन्मान दिला जात नाही!

तर वरील सर्व गोष्टी पितृदोषास कारणी भूत ठरतात. आता आपण अंत्येष्टीतील विधी उद्यापासून जाणून घेऊत व नंतर क्रमाने पितरांचा त्रास नेमका कसा ओळखावा  व त्यावरील उपाय काय ते दररोज जाणून घेऊत.

पितृदोष २

           मनुष्य मृत झाला की सर्व संपले असा अनेकांचा समज असतो . परंतू मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती अतीसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण होईल यासाठी झटत असते . देह जो प्रत्यक्ष दिसतो तो यानंतर कारण देह , महाकारण देह व सूक्ष्मदेह या रूपात ती व्यक्ती असते यातील सूक्ष्म देह तो पुढील मार्गक्रमणेस निघतो परंतु जोवर और्ध्वदैहीक होत नाही तोवर कारण व महाकारण देह तिष्ठत रहातात . आपण म्हणतो की कणखर मनाने केलेला संकल्प वातावरणात मिसळून तो पूर्णत्वासच जातो अगदी याच प्रमाणे जाणाऱ्या जिवाच्या जर इच्छा खूपच बाकी असतील व संसारात जिव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयाय ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी , आवडत्या व्यक्ती , जेवण बाकी असेल तर जेवण असे दिसत रहाते व तेच चिंतन करत ती व्यक्ती मृत होते  !
      
मनूष्य गेला तरी त्याचे डोळे चार तास , किडन्या चार तास , त्वचा वगैरे जिवंत असतात इतकेच काय तर चक्क रक्त प्रवाहही दोन तास सुरू असतो यातच वासना काय ते लक्षात घ्या ! तर अश्या या वासनांची पूर्ती करण्यासाठी लागलेली तगमग त्या जीवास मुक्ती मिळू देत नाही व ती सतत घरातील व्यक्तींस येनकेन प्रकारे अडचणी उत्पन्न करत असते अगदी तशीच जसे एखाद्या संकटातून एखादे पूण्य आपली सुटका करते तसेच !
   
ख्रीस्ती बांधव , पारशी लोक , इस्लामीक लोक इत्यादी लोकही पितृ कार्य करतात फक्त त्यांची पद्धत वेगळी असते . ख्रीस्ती बांधव हे मृताच्या कबरीवर फुले , वाईन , केक ठेवतात व त्याच्या स्मृतीसाठी वाटतातही ! अगदी प्राणीही आपल्या पूर्वजांस वंदन करतात . यात हत्ती हा प्राणी अत्यंत पुढे आहे . हा हत्तीचा कळप एका मादीच्या नेतृत्वाखाली अन्न व पाणी यांच्या शोधात स्थलांतर करीत असतो  . वाटेत अनेक बांधव ( हत्तींचे ) मृत होतात . अशावेळी तेथे थांबून घोळक्याने श्रद्धांजली वाहून पुढे निघतात यावेळी गेलेला हत्ती ज्याच्या जवळचा असतो तो जरा रेंगाळतो परंतू त्याला काहीजण आधार देऊन बाहेर आणतात . हा प्रकार इथेच थांबत नाही तर ज्या तारखेस तो हत्ती/हत्तीण गेला होता त्याच दिवशी आठवणीने त्याच जागी सर्व कळप त्या मृतास मानवंदना देण्यास उपस्थित रहातो . यावेळी मृताच्या अस्थी तेथे असतात . कळपातील प्रत्येक सदस्य त्या उचलून आपल्या कपाळी लावतात . तेथे जरावेळ थांबतात व पुन्हा आपल्या मार्गाने जातात . ( हे सर्व मी नाही संशोधकांनी सिद्ध केले आहे ज्यावर डीस्कव्हरी या चॅनेलवर कार्यक्रम प्रदर्शीत केला गेला होता ) यावेळी कळपातील सदस्य काही खाण्याच्या वस्तूही नेतात ज्या त्या अस्थींजवळ अर्पीत करतात.
      
या सर्वात मानव अत्यंत प्रगत म्हणून त्यान आपल्या पूर्वजांस श्रद्धांजली देणे किती गरजेचे असते ते पहा !  उद्या आपण पिंडदानच का व दहावा बारावा म्हणजे नेमके काय ते पाहूत

पितृदोष ३

           प्रथम दिनी गेलेल्या व्यक्तीचा दाह संस्कार होतो यावेळी मृतस्थानी , द्वारस्थानी , विश्रांती स्थानी काष्ठ रचनेवेळी आणि चौकात पिंड देतात यामुळे भुमीवरील , गृहवास्तु , प्रेतास वाईट शक्तींनी अपवित्र करूनये यासाठी केले जाते . पुढे नवद्वारांवर पिंड ढेवून क्रव्याद नावाच्या मांस भक्षक अग्निस आवाहन करून बोलावले जाते . स्मशानात पिंडदान करताना प्रेतसखा म्हणजे त्या दिवशी आणखी कोणी गेलेली व्यक्ती असेल त्यासाठीही पिंडदान केले जाते .
      
नंतर प्रत्येक दिवशी स्मशानात जाऊन दहा दिवसांपर्यंत पिंड द्यावेत . नंतर दहाव्या दिवशी दशक्रिया विधी होते . जर दररोज पिंडदान केले असेल तर दहाव्या दिनी केवळ एक पिंड देऊन काक बली द्यावा लागतो अन्यथा एकाचवेळी दशपिंड द्यावे लागतात . ही दशक्रिया विधीची संकल्पना मानवी जन्मावर अधारीत आहे . जसे प्रथम मातेच्या गर्भात छोटासा पिंडच असतो तशीच कल्पना करून पहिला पिंड देतात . यात सम व विषम श्राद्ध अशी संकल्पना असते . विषमदिनी अवयव पिंडही देतात . पहिला पिंड मस्तक , दुसरा पिंड कान , नेत्र , आणि नाक , तीसरा पिंड गळा , खांदे , भुजा व वक्ष:स्थल , चौथा पिंड नाभी , लिंग /योनि व गुदा , पाचवा पिंड जानु , जंघा ,  पाय , सहावा पिंड सगळी मर्म स्थाने , सातवा पिंड सगळ्या नाड्या , आठवा पिंड दात केस वगैरे , नववा पिंड विर्य व रज , दहावा पिंड संपूर्ण शरीर . अगदी हेच आईच्या पोटातही घडत असते व दहाव्या महिन्यात बाळाचा जन्म होतो . याच संकल्पनेवर देह जळाला मग पुढे गर्भात जाताना त्या जिवास सगळे शरीर अवयव मिळावे हि संकल्पना असते . त्यामुळे दहावा हा दहाव्या दिवशीच करावा . तीसऱ्या , पाचव्या दिवशी नाही कारण यात वेळ किंवा कोणी नातेवाईक यावेत म्हणून दिला जाणारा हा वेळ नाही .
     
पाच बोळकी घेऊन त्यावर पाच पिंड सोबत पाच काड्यांवर पिवळ वस्त्र जे ध्वजे सारखे दिसते ते असते छत्री म्हणून . पाच पोळी पादूका जोड वगैरे असतात . पाच पिंड पहिला गेलेल्या व्यक्तीचा , दुसरा प्रेतसखा , तीसरा वैवस्वत यम , चौथा वायस म्हणजे कावळा व पाचवा प्रेताधिपती रूद्राच्या नावे द्यावा . यानंतर वायसबली म्हणजे कावळा शिवणे होते . व कावळा शिवला नाही तर दर्भाचा कावळा करतात . यात दर्भ , काळे तीळ , जव व पांढरी फुले , माका , तुलसीपत्र अत्यंत महत्वाचे असते .

पितृदोष ४

           अकरावे दिनी सर्व घरातील कपडे वगैरे स्वच्छता केली जाते . यानंतर पंचगव्य वगैरे प्राशन करून वृषोत्सर्ग विधी पूर्वी करीत असत . याच दिवशी एकोद्दिष्ट ( म्हणजे फक्त एकास उद्देशून केलेले ) श्राद्ध केले जाते . यापाठोपाठ रूद्रगण श्राद्ध , वसुगण श्राद्ध व  यानंतर मलीन मासिक श्राद्ध केले जाते . यावेळी विविध दशदाने करून समाप्ती केली जाते .
     
बारावे दिवशी सपिंडी श्राद्ध केले जाते . यात चार पिंड बनवून त्यातील गेलेल्या व्यक्तीच्या नावाच्या पिंडाचे तीन भाग करून बाकीच्या तीन पिंडात मिसळले जातात . चार पिंडात पहिला पिंड मृत व्यक्तीचा , दुसरा पिंड प्रेताचे वडिल , तीसरा आजोबा , व चौथा पणजोबांचा असतो . यातील पहिल्या पिंडाचे तीन भाग उरलेल्या तीन पिंडात मिसळल्यावर गत व्यक्ती पितृलोकी जाते व पणजोबांस मुक्ती मिळते . हा विधी केल्या शिवाय सुतकातून सुटकाच होत नाही व पुढे कोणतेही शुभ कर्म करू शकत नाहीत हा नियम सर्व वर्णांस लागू आहे . नंतर पाथेय श्राद्ध करून विधी संपतो .
      
तेरावे दिनी प्रथम निधनशांती करतात . यात गणेशपुजन पुण्याहवाचन रूद्र पुजन करतात व विप्रांकडे विविध सुक्ताचे पठण करतात तर बाकीकडे हवन केले जाते . नंतर सुतकात गंध , कुंकू वगैरे लावलेले नसते ते लावून घरातील देवपूजा केली जाते . या विधीसाठी चार गुरूजी लागतात . यात उंबऱ्यावर सुपारी फोडली जाते .
      
यानंतर तेराव्याचे श्राद्ध केले जाते . यासोबतच शुद्ध सोळा मासिक श्राद्धे केली जातात . यात तेरा ब्राह्मण भोजनास सांगतात . परंतू अभावी किमान पाच म्हणजे दोन देवा कडील व तीन पितरांचे असे भाेजन करतात . यास मासिक निवृत्ती असेही म्हणतात . आलेल्या गुरूजींस व चालवणाऱ्या गुरूजींस दशदाने पददानादी सह उदककुंभ व दक्षिणा दिली जाते . दुपारी आहेर करून यजमानांचे मामा यजमानास मारूतीच्या मंदिरात नेतात . तेथे नवीन निरांजनात दिवा लावून नमन करून बाहेर पडताना देवळाची घंटी वाजवतात . यादिवसापासून रोजची कर्मे करण्यास सुरूवात केली जाते . जर कोणाचा विवाह ठरला असेल तरच तो विनायक शांती करून करावा अन्यथा पुढे तीन वर्षे विवाह करता येत नाही हा समज अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे असे करू नये .

पितृदोष ५

          तेरावे वगैरे आटोपल्यावर चौदावे दिवशी वातावरण शुद्धी साठी उदकशांती नावाचा विधी करतात . उदकशांती अर्थात जलाची शुद्धी असा सरळ अर्थ होतो परंतु प्रत्यक्षात जर पाहीले तर जल हे अत्यंत पवित्र मानून त्याद्वारे समंत्रक केलेली पंचतत्वांची शुद्धी म्हणजे उदकशांती होय . जर आपण मृत झालेल्या व्यक्तीच्या घरात गेलात तर सहज लक्षात येते की तिथे संपूर्ण भागात उदासी पसरली आहे . मग अशावेळी हे शोकमग्न वातावरण सारून पुढे चालणे व दैनंदिन कामे करणे ही निकड असते . यासाठी ही उदकशांती करतात .
      
काही लोकांचा गैरसमज असतो की उदकशांती हा विधी फक्त यावेळीच केला जातो परंतु , तसे नसून हा विधी घरातील कलह , आजारपण , काही विशीष्ट होणारे त्रास , सतत मानसिक तणाव व त्यामुळे सर्व घर डीस्ट्रब होऊन सतत भांडणे , नुकसान व याने झालेली पंचतत्वांची हानी भरून काढण्यासाठीही हा विधी दर सहा महिन्याने आपल्या घरी करावा असे शास्त्र सांगते . तसेच नारायणबली , व नागबली करून आल्यावरही काही लोक ही उदकशांती करतात . स्थानिक गुरूजी ज्यांनी नारायण बली केलेला असतो ते याबद्दल कल्पना देतात किंवा ज्या गुरूजींनी हा विधी करण्यास पाठवले ते याबद्दल सांगून हा विधी करवून घेतात .
    
या विधीत चार गुरूजी असतात . प्रथम गणेशपुजन व पंचवाक्यीय पुण्याहवाचन करून मग एका नवीन कलशास धुपवून त्यात पाणी घातले जाते . येथे हवन करीत आहोत अशी संकल्पना करून हवनाचे वेळी हवनपात्रासाठी करण्याचे स्थंडील कर्म करतात . नंतर चारही दिशेस दर्भ मांडून ब्रह्मदेवांचे पूजन केलेल्या कलशावर शंभर ते हजार अश्या प्रकारे दर्भाचे अच्छादन करतात . हे अच्छादन एखाद्या झोपडी सारखे दिसते .
     
चारही दिशांस बसून चारही गुरूजी चतुर्वेदातील ऋचांचे स्वर व सुरात पठण करतात . नंतर यजमानासह सर्व कुटूंबीयावर आंब्याच्या डहाळीने ब्रह्मकलशातील पाण्याने गुरूजी अभिषेक करतात ! यानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन होते . मग यजमानास आशिर्वाद मंत्राने नारळ देऊन तो नारळ यजमानांनी पत्नीच्या ओटीत द्यायचा असतो व या नारळाचे गोड पदार्थच बनवतात .

पितृदोष ६

        मागे दिलेले तेराव्या पर्यंतचे विधी यथासांग पार पडले की मग येते अब्दपुरीत श्राद्ध . अब्दपूरीत म्हणजे त्यादिवशी वर्षपूर्ती झाली त्याचे श्राद्ध ! जसे रेल्वेच्या पासवर सत्तावीस तारखेचा पास सव्वीसला संपते त्यानुसार ज्या तिथिस मृत्यू झाला त्याची आदली तिथि ही अब्दपूरीतासाठी घेतात . उदा. मृत्यू माघ कृष्ण दशमी असेल तर पुढील वर्षी माघ कृष्ण नवमीस अब्दपूरीत व दशमीस प्रथमाब्दिक म्हणजे पहिले वर्ष श्राद्ध होय . हे खरे तर कायम करावे असे शास्त्र सांगते परंतू किमान पहिले तीन वर्ष तरी पिंडदाना सह गुरूजी बोलावून करावे असे वाटते .
  
आता आपण वळूयात मूळ विषयाकडे पितृदोष ! वरील सर्व कर्मे करताना यत्किंतीतही तृटी चालत नाही जसे पुजेत एखादी वस्तू नसेल तर एेवजी अक्षता वाहतात तसे इथे चालत नाही . त्यामुळे वा गुरूजींनी दिलेली माहिती नीट न समजणे , कधी कधी गुरूजी जे सांगतात ते व घरातील काही मंडळी हे आमच्यात नसते म्हणतात त्यामुळे तो विधी केलाच जात नाही याने पत्रिकेत पितृदोष येत असतो . हे अनेक पिढ्या मागे चालत आलेले असते . जसा एखादा आजार एकदम उद्भवत नाही त्याची लक्षणे आधी दिसतात व नंतर तो आजार जोर करतो अगदी तसेच हे असते !
 
१ ) घरातील कर्ता पुरूष अचानक मृत्यू पावणे .
 
२ ) घरातील तरूण मुलाचा अचानक काहीही न घडता साध्या कोणत्याही कारणाने अचानक मृत्यू होणे .

३ ) एेन जेवणाचे वेळी घरात भांडणे होणे व त्यामुळे अन्न वाया जाणे .

४ ) घरात चांगली केलेली पुण्यकृत्ये लागू न पडणे व आणखी वाईट होणे त्यामूळे श्रद्धा डळमळीत होणे .

५ ) दोन सख्य असलेले भाऊ (लग्नांनंतरही सख्य कायम ) अचानक वितूष्ट येऊन वेगळे होणे व अगदी हा मरावा इतका द्वेष वाढणे .
 
६ ) दोन भाऊ असता एकाचे खूप चांगले होणे व दुसरा अगदी दरीद्री बनणे व योग्य असूनही नोकरी , विवाहात नाकारले जाणे .

७ ) घरात अनेक जण किंवा काही जण अविवाहित असणे व घराण्यात संतती नसणे .

८ ) पैसा योग्य कारणासाठी खर्च न होता तो अचानक उद्भवलेल्या आजारपण अॅक्सीडेंन्ट यावर खर्च होणे व कर्ज काढावे लागणे .

९ ) विविध प्रकारची भितीदायक स्वप्ने पडणे ज्यात घरातील वडिलमंडळी खायला मागत आहेत असे दिसणे .

१० ) तिर्थयात्रा , तेथे केलेली श्राद्धे लागू न पडणे .

पितृदोष ७

१) घरात पुरेसे अन्नधान्य भरूनही ते न पुरणे वा बनवलेले वाया जाणे . ( हे अन्न बाहेर टाकल्यावर कोणताही प्राणी खात नाही ).

२ ) घरात काही देवाचे कार्य वा शुभकार्य ठरले की नेमक्या अडचणी उभ्या रहाणे वा ऐनवेळी भांडणे होणे व केलेल्या कार्याचे समाधान साध्य न होणे .

३ ) घराण्यात कुटूंब विभक्त होणे व होणारी कार्ये बंद पडणे .

४ ) घरात वडिलधारी मंडळी काहीही मार्गदर्शन करण्यासाठी शिल्लक न रहाणे .

५ ) हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या सुरू होणे पण मध्येच खीळ बसणे.

६ ) घरातील मुलगा / मुलगी सर्व काही योग्य असूनही विवाह न होणे .

७ ) जोडप्यात कोणताही दोष नसताना व डाॅ. इलाज सुरू असूनही संतती न होणे / संतती न वाचणे / वारंवार गर्भपात होणे / संततीत व्यंग असणे / मतीमंद संतती जन्माला येणे.

पितृदोष

           आपल्याला होणारी संतती ही फक्त आणि फक्त पितरांच्या आशिर्वादानेच होते ! जर संतती होत नसेल तर जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा तीन पिंड असतात त्यातील दोन नंबरचा ( मधला) पिंड संतती न होणाऱ्या स्त्रीस खाण्यास देतात !
       
आपण जी दीपावली करतो ती देखील पितरांसाठीच असते . नुकतेच महालय व पितृपंधरवडा आटोपलेला असतो . यानंतर कोजागीरीस आकाश दीपदान करतात अर्थात आकाश कंदील लावतात .मग सुरू होते दीपावलीची धामधूम . यात पितरांस आम्ही खूप सुखी आहोत हे दाखवणे हा हेतू असतो . याचवेळी दक्षिणेकडे दीपदान करतात . यमतर्पण करतात .
      
या पितृदोषासाठी त्रीपिंडी , नारायण बली , नागबली , केला जातो . तसेच आणखीही काही सोपे उपाय आहेत तेही केल्याने फायदा मिळतो .
     
नारायण बली व नागबली हे दोन स्वतंत्र विधी आहेत . तीन दिवसात पहिले नारायण बली , दुसरी नागबली व तिसरे दिनी गणेशपुजन पुण्याह वाचनादी कर्म व नवग्रहांचे हवन केले जाते .
     
त्रीपिंडी हा विधी एकाच दिवसात करता येतो. वरील विधी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर , नाशिक , नरसोबाची वाडी , वाराणसी , गोकर्ण महाबळेश्वर , गया प्रयाग , आदी ठिकाणी स्थान महात्म्यामुळे केला जातो . तसेच जेथे तुलसीची वने आहेत तेथे , वडाचे झाड , तलाव व श्री शिवमंदिर , संगमस्थान , समुद्र किनारा , पिंपळवृक्ष व शिवाचे मंदिर व नदी संगमाचे ठिकाणीही हा विधी केलेला चालतो . हल्ली हा विधी हरीहरेश्वर येथेही करतात .

पितृदोष ९

        नारायण बली . हा विधी घरात कोणाचा अपमृत्यू , अपघाती , आत्महत्या , खून , दिर्घ आजार , पाण्यात बुडून , भाजून , चोरांनी मारून इत्यादी प्रकारे मृत्यू झाला असल्यास त्याचा दोष जाऊन आत्यास गती मिळावी यासाठी केला जातो. तसेच घरातील मागील पिढीत दशक्रियादी कार्ये नीट झालेली नसतील त्या सर्वांचा , घरातील न केल्या गेलेल्या श्राद्धांचा सर्व प्रकारचे सात पिढीतील दोष पित्या कडून व माते कडून आलेले नाहीसे होतात . तसेच हा विधी वडिल आई हयात असतानाही मुलास करता येतो .
   
या विधीची सुरूवात गंगा स्नानाने होते . तेथे गंगेची पुजा वगैरे करून त्या जलस्त्रोतास वंदन करून हे कर्म आज सुरू करीत आहोत हे सिद्धीस जावो असे आशिर्वाद मागून भस्म स्नान व मृत्तीका स्नान व पुन्हा गंगा स्नान केले जाते . यावेळी सफेद वस्त्र नेसायचे असते . एकट्या पुरूषानेही हा विधी केला तरी चालतो तसे समस्त कुटूंबीय तेथे हवेतच असेही काही नसते यासाठी एकटा माणूसही हा विधी जाऊन करून येऊ शकतो .
     
यानंतर ओलेत्यानेच शिव मंदिरास प्रदक्षिणा घालून तेथील कुंडावरून पाणी भरून स्मशानात जातात . येथे . ब्रह्मा , विष्णू , महेश , यम व प्रेत या पंच प्रतिमांचे ( या प्रतिमा अनुक्रमे सोने , चांदी , ताम्र , लोह व शिसे यांच्या असतात ) पंचकलशांवर स्थापना करून षोडषोपचारे पुजन केले जाते . प्रेताचे पुजन करून यथाविधी त्याचे दहनादी कर्म केले जाते . त्या अनुषंगाने येणारे दशक्रियादी विधी केले जातात . नंतर त्या दहन केलेल्या पुतळ्याची राख वगैरे सावडून पाण्यात विसर्जीत करतात या दिवशी व पुढील तीन दिवस सुतक पाळतात .

पितृदोष १०

         तीन दिवसाचे सुतक संपले की चौथ्या दिवशी नागबली करतात . या दिवशी ब्रह्मा , विष्णू , महेश , काल व सर्प  या पंच देवतांचे षोडषोपचारे पुजन होते . नंतर सर्पाचे दहनादी विधी होऊन अष्डपींड दान केले जाते . पुन्हा सायंकाळी राख वगैरे सावडून पाण्यात विसर्जीत करतात . हा विधी घराण्यात कोणी सर्प मारला असेल किंवा चुकून अपघाताने मारला गेला असेल तर त्याचे दोष जाण्याकरीता करतात . कुंडलीतील सर्प दोष ( कालसर्प ) याने जातात .
       
याचे तीन दिवसांचे सुतक संपले की चौथ्या दिवशी आंघोळ वगैरे उरकून गुरूजींच्या घरी गणेशपुजन , पुण्याहवाचन , नवग्रह पुजन केले जाते याचे वैशीष्ट्य असे की जर तुमची जन्मनक्षत्र शांती झाली नसेल तर ती ही यातच होते इतके हे पुजन महत्वाचे असते . यानंतर भोजन वगैरे झाले की गुरूजींना ठरलेली दक्षिणा व ऐपती प्रमाणे दाने किंवा त्या ऐवजी यथाशक्ती दक्षिणा देतात .
      
हल्ली हा विधी फक्त तीन दिवसात उरकला जातो परंतु ते शास्त्र संमत आहे .
      
पितृदोष जाण्या करीता श्री गुरूचरीत्राचा वीस आणि एकवीसावा अध्याय वाचल्याने ही श्री गुरूकृपेने पितर संतुष्ट होऊन त्यांना गती प्राप्त होते.

Friday, April 14, 2017

निसर्गदत्त दागिने जाळू नका…Organ Donation!!

निसर्गदत्त दागिने जाळू नका…

मृत्यूनंतर आपण मृतदेहावरचे मौल्यवान दागिने काढून घेतो. पण डोळे, त्वचा हे आपले निसर्गदत्त मौल्यवान दागिने काढून घेतले तर एखाद्या गरजू जिवाला त्याचा उपयोग होऊन त्याचं जीवन सुधारू शकतं. तेव्हा नेत्रदान, त्वचादान, देहदान करा..

पृथ्वीवरील प्रत्येक कीटक, पशुपक्षी, प्राणिमात्र मृत्यूनंतर काहीना काही रूपात इतरांच्या कामी येतो. गाय, म्हैस यांची चरबी व चामडी, मोराची पिसे, हत्तीचे दात वगरे उपयोगात येतात. काही प्राणी तर इतरांचे भक्ष्य बनतात. परंतु मनुष्यप्राणी मृत्यूनंतर आपल्या सजातीयाच्या शवाचे दहन किंवा दफन करून मातीमोल करून टाकतो. पण काही प्राण्यांच्या बाबतीत तसे होत नाही. उदाहरणार्थ साप दिसला की ठेच त्याचे डोके. पण त्याच सापाच्या विषाचे संकलन करून त्यापासून असाध्य रोगावर जीव वाचवणारे औषध बनवू शकतो हे तारतम्य आपण बाळगत नाही. जवळची व्यक्ती गेली की लाकडे मागवून तिला अग्नी देणे किंवा जमिनीत पुरणे हाच आपला प्रघात आहे. सर्व जाती-धर्माचे लोक साधारणपणे मृत्यूनंतर मृताच्या शरीरावरील मौल्यवान दागिने काढून घेतात. सोन्याचे दागिने किमती आहेत ते कसे वाया घालवणार, हे सर्वाना समजते परंतु परमेश्वराने दिलेले त्याहूनही अनमोल दागिने म्हणजे डोळे, त्वचा इत्यादी जमिनीत गाडून मातीमोल करणे किंवा जाळून टाकणे किती योग्य आहे?

आज आपल्या भारतीयांचा अवयवदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदलत आहे, परंतु तो अधिक ठामपणे बदलायला हवा.

वैद्यकशास्त्र अतिशय प्रगत झाल्याने अवयवदान खूप सोपे व सोयीचे झाले आहे. तरीसुद्धा लोक धर्माचा आधार घेतात. कुराण, पुराण किंवा बायबल काळात मृताचे अवयव प्रत्यारोपण करून कोणाचा जीव वाचवता येईल इतपत वैद्यकशास्त्र प्रगत नव्हते. अन्यथा आज सर्वाचा तसा धार्मिक प्रघात असता. आजारी पडल्यास इलाज आजच्या प्रगत शास्त्राचा पण अवयवदानाचा विषय आल्यावर आधार पुराणशास्त्राचा? केवढा हा विपर्यास? त्यामुळे अवयवदान हा सार्वजनिक प्रघात व्हायला हवा. प्रत्येकाने जात-पात-धर्म न पाहता दान करावे. एखाद्याने नाही केले तर त्याला मोठा प्रश्न पडावा की मी अवयवदान केले नाही तर लोक काय म्हणतील?

आजवर अवयवदानात सामाजिक, धार्मिक रूढी-परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा आडव्या येत गेल्या. आता आता कोठे अवयवदानाची माहिती व प्रसार होत चाललाय, परंतु तरीदेखील लोकांची उदासीनता किंवा पारंपारिक पद्धतीच्या अंत्ययात्रा व तेच ते धर्मावर (अंधश्रद्धेवर) आधारित मृत्यूनंतरचे क्रियाकर्म, कर्मकांड या सर्वामुळे परमेश्वराने बहाल केलेला अनमोल खजिना मानव जातीच्या उपयोगात येऊन कोणाला जीवनदान मिळण्यासारखे असूनसुद्धा आपल्याकडून दुर्दैवाने त्याची राखरांगोळीच केली जाते आहे.

देहाला अग्नी न देता त्याचे दान केले तर मोक्ष मिळणार नाही, आत्मा भरकटत राहील, पिंडाला कावळा शिवणार नाही, नेत्रदान केल्यास पुढच्या जन्मी मी आंधळा जन्माला येईन इत्यादी भ्रामक कल्पनांच्या आधारे नकारात्मक भूमिका घेऊन अज्ञानी (?) लोक पळवाट काढतात. खरं पाहता या गोष्टी कोणत्याही धर्मग्रंथात सांगितलेल्या नाहीत, देहदान-अवयवदानास सर्व धर्मानी व धर्मगुरूंनी मान्यता दिलेली आहे. मुळात ‘दान हा प्रत्येक धर्माचा पाया आहे’. शवाचे दहन किंवा दफन करणे म्हणजे एक प्रकारे अग्नीला किंवा भूमीला आपण ते दानच करतो असे नाही का? मग त्याप्रमाणे तो देह आपल्या म्हणजे मानवजातीच्या पुनर्जीवनासाठी कामास येण्याच्या उदात्त हेतूने अवयवदान करणे उत्तम नाही होणार का? शरीर हे क्षणभंगुर आहे, मृत्यूनंतर देह संपणार. मात्र अवयवरूपी जिवंत राहायचे असेल तर ‘अवयवदान’ करावे.

रक्तदानाबाबतसुद्धा समाजात असेच गैरसमज होते. आता बरीच जागरूकता आलेली आहे. खरं तर रक्त हा शरीराचाच एक हिस्सा आहे, तो जिवंतपणी आपण सर्वजण नियमितपणे दान करू लागलो आहोत म्हणजे तो विषय आता आपल्या चांगलाच अंगवळणी पडला आहे. मात्र अजून आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने हजारो रुग्ण वर्षांनुवर्ष प्रतीक्षा करत करत मृत्यूला सामोरे जात आहेत.

कुठलाही रुग्ण मृत झाल्यानंतर त्याचे शोकाकुल नातेवाईक अवयवदानाचे महत्त्व समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळे त्या वेळच्या अवयवदानाच्या सूचनांना ते विरोध करतात. अनेक देशांत मृत व्यक्तीने मरण्याआधी आपले अवयव दान करू नयेत, असे स्पष्ट जाहीर केले असेल, तरच त्या व्यक्तीचे अवयव दान केले जात नाहीत. अन्यथा प्रत्येक व्यक्तीची या अवयवदानाला मान्यता आहे, असेच मानून त्वरित कार्यवाही केली जाते. आपल्या देशात अशी व्यवस्था नाही. प्रतीक्षा यादी व नेत्रदाते यात फार मोठे अंतर आहे. श्रीलंकेसारखा छोटासा देश नेत्र निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला मात्र त्यांच्याकडून नेत्र आयात करावे लागतात ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे? नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान याला प्रघाताने अवयवदान म्हटले आहे. ते प्रत्यक्ष करायचे असल्यास काय करावे हे आत्ताच नीट समजून घ्यावे व यापुढे आपल्या माहितीत कोणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांचे सांत्वन करून नेत्रदानासाठी प्रोत्साहित करावे. आपलं एक सकारात्मक पाऊल आजच्या काळाची पायाभूत गरज आहे. आपल्या आयुष्यात एक तरी अवयवदान घडवून आणा.

मृत्यूच्या वेळेपासून तीन ते चार तासात नेत्रदान/ त्वचादान होणे उत्तम. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये सहा तासांच्या आत नेत्र स्वीकारले जातात. त्यानंतर ते स्वीकारता येत नाहीत.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिने नेत्रदानाचा संकल्प सोडलेला असेल तर  सर्वप्रथम जवळच्या नेत्रपेढीस बोलवावे किंवा जवळच्या नेत्रदान व त्वचादान समन्वयक (Organ Donation Coordinator) / संस्था यांना फोन करून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. असे महत्त्वाचे फोन नंबर कुटुंबातील सर्वाना सहज सापडतील अशा ठिकाणी लिहून ठेवलेले असावेत.

नेत्रदानाचा संकल्प केला आहे, त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दात्याच्या मृतदेहावरील सर्व पंखे बंद करावे, एसी (उपलब्ध असल्यास) चालू करावा. (ज्यामुळे डोळे सुकणार नाहीत.)

डोक्याखाली किमान दोन उशा ठेवाव्यात.

बंद डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्टय़ा ठेवाव्यात (शक्यतो बर्फाच्या) (ज्यामुळे नेत्रपटल ओले राहतील).

डॉक्टरकडून मृत्यूचे कारण, (कॉज ऑफ डेथ) वय, वेळ नमूद केलेले मृत्यू सर्टिफिकेट (डेथ सर्टिफिकेट) प्राप्त करून आय बँकेस पाठवावे (व्हॉट्सअ‍‍ॅप, स्कॅन). त्यामुळे आय बँकेस निर्णय घेणे सोपे जाते. शक्य असल्यास त्याच वेळेस दहा सीसी रक्ताचा नमुना घेऊन ठेवल्यास उत्तम.

नेत्रपेढीचे व त्वचापेढीचे तज्ज्ञ किंवा डॉक्टर घरी येऊन (मृतदेह दवाखान्यात असल्यास तेथे येऊन) नेत्रपटल / त्वचा काढून नेतात (या प्रक्रियेस प्रत्येकी सुमारे अर्धा तास लागतो).

नेत्रदान / त्वचादानानंतर चेहरा किंवा देह अजिबात विद्रूप होत नाही. (कदाचित नेत्रदान झाले आहे किंवा नाही हे समजतही नाही).

दात्याला मृत्यूसमयी कावीळ, हिपॅटायटिस बी/ सी ,एड्स, कॅन्सर, शरीरभर सेप्टिक पसरणारे इन्फेक्शन, इ. आजार असल्यास अशा परिस्थितीत नेत्रदान, त्वचादान होऊ शकत नाही. याव्यतिरिक्त कुणीही नेत्रदान करू शकतो. हे संपूर्ण गुप्त दान असते. घेणाऱ्याला अथवा देणाऱ्याला त्याची माहिती दिली जात नाही.

डोळ्याच्या काळ्या बाहुलीवर घडय़ाळाच्या काचेसारखा भाग आहे. या काचेला ‘कॉर्निआ’ (पारपटल) असे म्हणतात. फक्त याच भागाचे रोपण करता येते. संपूर्ण बुबुळ / डोळा वापरला जात नाही. कॉर्निआमध्ये रक्तवाहिन्या नाहीत त्यामुळे कोणतेही क्रॉसमॅचिंग न करता कॉर्निआ यशस्वीपणे कलम करून कोणालाही बसवता येतो.

विशेष बाब म्हणजे; नेत्रदानात फक्त कॉर्निआ रोपण केले जात असल्यामुळे, कॉर्निआ व्यवस्थित असून अन्य कारणामुळे अंधत्व आलेली अंध व्यक्तीदेखील नेत्रदान करू शकते!

डायबेटिस असलेली, जाड भिंगाचा चष्मा असलेली, मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेली व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकते.

नेत्रदान, त्वचादानासाठी वय, लिंग, रक्तगट यांची कोणतीही मर्यादा नाही. नेत्रदान, त्वचादान, देहदान या सर्वासाठी ‘सहा तासांच्या आत’ ही वेळेची मर्यादा फार महत्त्वाची आहे.

आपल्या नेत्रदानामुळे किमान दोन (नवीन तंत्रज्ञानामुळे यापुढे चार ) दृष्टिहीनांना आपण नेत्रज्योती प्रदान करू शकतो ज्यामुळे त्यांचे जीवन नुसते बदलतच नाही तर ते अंधत्वातून कायमचे मुक्त होतात.

आधी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरलेला असला किंवा नसला तरी प्रत्यक्ष अवयवदानाच्या वेळी नातेवाईकांच्या संमतीने अवयवदान करता येते.

रक्तदान जिवंतपणी करता येते, परंतु नेत्रदान मृत्यूनंतर करावयाचे असते. जगातलं हे एकमेव दान आहे, जे आपण करूनही आपल्याला पाहता, अनुभवता येत नाही. आपली दानाची इच्छा आपले जवळचे नातेवाईकच पूर्ण करू शकतात.  म्हणून आपण नुसते इच्छापत्र (डोनर्स कार्ड) भरून न ठेवता आपल्या जवळच्या जास्तीतजास्त नातेवाईकांना आपल्या इच्छेबाबत सांगून ठेवावे. आपले नेत्रदान केले जाऊन त्या डोळ्याचे रोपण होऊन कुणाला तरी दिसू लागेल, आपली अंतिम इच्छा नक्की पूर्ण होईल अशी खात्री झाल्यानंतर एक अलौकिक समाधान व आनंद आपण अनभवू शकतो. बहुधा वाढदिवस किवा लग्न इत्यादी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आपली इच्छा जाहीर केल्यास दुहेरी लाभ होऊ शकतो जेणेकरून इतर आप्तजनांना आपल्या इच्छेची माहिती होईल व तेदेखील देहदान अवयवदानास प्रवृत्त होतील. स्वत:च्या प्रयत्नाने एकाचे तरी नेत्रदान घडवून आणा.

त्वचादान

शरीरावर त्वचेचे एकंदर सात थर असतात, त्यापैकी सर्वात वरची त्वचा डरमोटोम नावाच्या बॅटरीवर चालणाऱ्या छोटय़ाशा मशीनने काढून घेतली जाते. कांद्याच्या दोन पडद्यामधील दुधी रंगाचा अतिशय पातळ पापुद्रा असतो तितकी पातळ त्वचा काढली जाते. बऱ्याच वेळा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनासुद्धा त्वचादानाबद्दल नीट माहिती नसते. लोकांमध्ये त्वचादानाबाबत भरपूर गैरसमज असतात. त्यांना त्वचादान केल्यानंतर ती घेणारे संपूर्ण शरीर सोलून काढतात असेच वाटते. पण सत्य हे आहे की  त्वचादानामध्ये रक्ताचा एक थेंबदेखील येत नाही. पायाच्या घोटय़ापासून जांघेपर्यंतच्या भागाचीच त्वचा घेतली जाते. काही परिस्थितीमध्ये पाठीच्या भागाची त्वचासुद्धा घेतली जाते. त्वचादान केल्याने शरीर अजिबात विद्रूप होत नाही. त्यात पायाला अतिशय योग्य तऱ्हेने बँडेज लावले जातात. कधी अपघाताने शरीर फाटले तर टाके मारून ते शिवता येते, हाडे तुटली तर कृत्रिम रॉड टाकता येतो, पण भाजण्याच्या जखमेवर कोणतेही हमखास बाह्य़ उपचार नाहीत. निसर्गनियमाप्रमाणे आतून येणारी त्वचाच जखम भरून काढू शकते. पण त्वचा खोलवर भाजल्यास त्या जागी जिवंत त्वचापेशीच शिल्लक राहत नाहीत त्यामुळे हवेतून होणाऱ्या सततच्या जंतुसंसर्गामुळे जखमा भरत नाहीत व चिघळतच राहतात. रुग्ण महिनोन्महिने मरणयातना भोगत राहतो. अशा केसेसमध्ये त्वचारोपणाचाच मार्ग उरतो. दानात मिळालेली त्वचा जखमेवर कोणत्याही विशेष ऑपरेशनशिवाय नुसती झाकल्यास जादू झाल्याप्रमाणे काही दिवसांतच हमखास जखमा भरून रुग्ण बरा होतो. असे असूनही आपण ती त्वचा मातीमोल करतो, जाळून टाकतो..

देहदान

शरीर विज्ञानशास्त्राच्या अभ्यासासाठी संपूर्ण देहदान करावयाचे असल्यास, विहित नमुन्यातील  फॉर्म 4-A (४-अ) भरायचा असतो. तो  नगरपालिका अथवा हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असतो. तो भरून देह किमान एका जवळच्या नातेवाईंकामार्फत सहा तासांच्या आत नजीकच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची पूर्वपरवानगी घेऊन पोहोचवावा लागतो. यातील कोणतेही फक्त एक, दोन किंवा तिन्ही दान करण्याचा निर्णय मृताच्या नातेवाईकांच्या संमतीनुसार घेता येतो. देहदान करण्यासाठी डोनर फॉर्म कोणत्याही संस्थेमार्फत कोणत्याही गावी भरला आणि मृत्यू दुसऱ्या ठिकाणी झाला तरी काहीही अडचण नाही. कोणत्याही प्रकारचा अवयवदानाचा फॉर्म भरलेला नसला तरी जवळचे वारस ऐन वेळी निर्णय घेऊन आपल्या इच्छेप्रमाणे दान करू शकतात.

अवयवदान

बहुतेक लोकांचा असा समज आहे की आपला कधीही आणि कसाही मृत्यू झाला तर आपल्या मृत्यूनंतर आपले सारे अवयव दान करता येतील पण ते खरे नाही. ‘जिवंत अवयवच’ शरीरातून काढले जातात. जिवंत म्हणजे ज्यांना रक्तपुरवठा सुरू आहे असे अवयव. अवयवदान हे प्रामुख्याने दोन प्रकारांत केले जाऊ शकते.

जिवंतपणीचे दान (लाइव्ह डोनेशन)
जिवंत व्यक्ती केवळ आणी केवळ आपल्या नातेवाईकांसाठीच अवयव दान करू शकते. कुटुंबातील सदस्य म्हणजे मुलगा, मुलगी, आईवडील, भाऊबहीण अथवा पती किंवा पत्नी. नातेवाईक किंवा मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीस जिवंतपणीच आपल्या शरीरातील एखादा अवयव दान करायचा असल्यास त्यास महाराष्ट्र शासनाची (ZTCC ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे) परवानगी घेणे आवश्यक असते. अवयवदानानंतर दात्याच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच ही परवानगी दिली जाते. त्यामुळे जिवंतपणी किडनी व यकृताचे काही प्रमाणात दान केले जाऊ शकते.

अवयवदानाच्या चळवळीत झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी सेंटरची भूमिका महत्त्वाची असते. एखादा पेशंट ब्रेनडेड झाल्यावर झेडटीसीसीचे स्वयंसेवक हॉस्पिटलमध्ये जाऊन अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगतात. ब्रेडडेड पेशंटची किडनी, लिव्हर, नेत्र असे अवयव मिळाल्यास दुसऱ्या पेशंटला नवीन जीवन मिळते.

मृत्यू पश्चात (कॅडेव्हर डोनेशन) : प्रत्येक व्यक्ती नेत्रदान व त्वचादान करू शकते; नव्हे प्रत्येकाने ते करायलाच हवे. तसेच आपण संपूर्ण देहदानदेखील करू शकतो. मात्र प्रत्येक व्यक्तीचे अवयवदान होऊ शकेलच असे शक्य नाही. कारण अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी (ऑर्गन ट्रान्सप्लान्ट) अवयवांना रक्तपुरवठा चालू असणे आवश्यक आहे. म्हणून मेंदुमृत (ब्रेन डेड) व्यक्तीच अवयवदान करू शकते, जी अवस्था अतिदक्षता विभागातच (आयसीयू) शक्य आहे. एखादा अपघात झाल्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केले जाते. विविध उपचार करूनदेखील रुग्णाकडून उपचारांना प्रतिसाद दिला गेला नाही तर न्यूरोसर्जन मेंदू तपासणी करतात त्या वेळेस जर मस्तिष्क स्तंभ मृत झाल्याचे निदान झाले तर तो रुग्ण (ब्रेन स्टेम डेड) मेंदू मृत घोषित केला जाऊ शकतो. ही अवस्था कोमासारखी असते. कोमात असलेला रुग्ण कधीतरी बरा होण्याची थोडीशी शक्यता असू शकते, परंतु मेंदुमृत रुग्ण कधीही बरा किंवा जिवंत होऊ शकत नाही. अशा अवस्थेत उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्ण मेंदुमृत झाला आहे असे घोषित करता येत नाही. मेंदुमृत असण्याची शक्यता वर्तवल्यानंतर सरकारने मान्यता दिलेल्या चार तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नेमली जाते. त्यातील कोणतेही दोन डॉक्टर सुरुवातीला अ‍‍ॅप्नेआ (APNEA) टेस्ट घेतात, त्यांना ती टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास आणखी तीन तासांनंतर वेगळ्या दोन डॉक्टरांची टीम येऊन खात्री करते त्यात सत्य आढळल्यानंतरच रुग्णाला मेंदुमृत घोषित केले जाते.

अशा स्थितीत रुग्ण मृत झालेला असूनही कृत्रिम उपकरणांच्या आधाराने त्याच्या हृदयाची क्रिया चालू ठेवल्यामुळे मॉनिटरचा ग्राफ चालू असताना दिसतो. उपकरणाच्या माध्यमातून हृदयाची स्पंदने सुरू ठेवल्याने संपूर्ण शरीरभर रक्तसंचार फिरता राहून प्रत्येक अवयवालादेखील रक्त मिळत राहते. ही स्थिती अवयवदानासाठी उपयोगी ठरते. ही रुग्णाच्या नातेवाईकांनी संमती द्यावयाची निर्णायक घडी असते. नातेवाईकांनी संमती दिल्यास, अवयवदाता मृत्यूच्या दारात अडखळलेल्या आठ अभागी जिवांचे प्राण वाचवून इतर अनेकांचे जीवन दु:खमुक्त करू शकतो. अवयवदान केल्यानंतर देह विकृत होत नाही. अगदी ऑपरेशन केल्यानंतर जशी असते तशीच रुग्णाची काळजी घेऊन अंत्यविधीसाठी देह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. मृत्यूनंतर देहदान केल्यानंतर आपले नेत्र, त्वचा, अस्थी, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्या, हृदय, फुप्फुस, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड इत्यादी महत्त्वपूर्ण अवयवांचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयोग होऊ शकतो.

देहदान, अवयवदानाबाबतीत असलेल्या गैरसमजुतींवर लोक पटकन विश्वास ठेवतात, पण योग्य व्यक्ती, संस्था यांच्यामार्फत सत्य समजून घेत नाहीत. एक सुज्ञ नागरिक म्हणून चला आता तरी मोघम माहितीपेक्षा सखोल माहिती मिळवून या विषयाचा पुरस्कार, प्रचार व प्रसार करून प्रत्यक्ष देहदान करण्याची परंपरा सुरू करू या.

आभार: श्री पुरुषोत्तम पवार, लोकप्रभा।

'BASICS' : Always the SUPREME yardstick

Unless and until the ' BASICS ' are in the right place, all other things would eventually fall into the category of appeasement. App...